कराड निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदासाठी २२ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ३३० उमेदवारी अर्ज दाखल

 
कराड : विद्या मोरे 

कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी मोठी गर्दी आणि चुरस पाहायला मिळाली. शहरातील सर्व प्रमुख पक्षांनी आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्जांची रेलचेल केली. आज दाखल झालेल्या अर्जांनंतर नगराध्यक्ष पदासाठी एकूण २२ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

नगराध्यक्ष पदासाठी बहुपक्षीय लढत निश्चित

अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
त्यात भाजपकडून विनायक पावस्कर, इंद्रजीत गुजर, राजेंद्र माने,
बसपकडून किरण थोरवडे व इमरान मुल्ला,
तर अपक्ष म्हणून गणेश कापसे, रणजीत पाटील आणि श्रीकांत घोडके यांचा समावेश आहे.

या उमेदवारांमुळे नगराध्यक्ष पदाची लढत अत्यंत रंगतदार आणि बहुपक्षीय होणार हे स्पष्ट झाले आहे.


---

नगरसेवक पदासाठी १५ प्रभागांतून मोठी उमेदवारी

सोमवारी नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतून अनेक पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
भाजप, शिवसेना, यशवंत विकास आघाडी, लोकशाही आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, जनशक्ती आघाडी, लोकसेवा शहर विकास आघाडी अशा प्रमुख आघाड्यांसह अपक्षांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून आला.

प्रभागनिहाय अर्जांचे तपशील :

प्रभाग १ अ : विमल माने (भाजप)

प्रभाग १ ब : सुदर्शन पाटसकर (अपक्ष), जयवंत पाटील (लोकशाही आघाडी), वीरेंद्र सिंहासने (लोकशाही आघाडी/काँग्रेस)

प्रभाग २ ब : नीलम कदम (लोकशाही आघाडी)

प्रभाग ३ अ : कश्मीरा इंगवले (यशवंत विकास आघाडी/राष्ट्रवादी), वंदना देशमुख (अपक्ष), जमीर नदाफ (काँग्रेस), तबसुम आंबेकरी (लोकशाही आघाडी)

प्रभाग ३ ब : रियाज मुजावर, फिरोज मुजावर (जनशक्ती), साहेबराव शेवाळे (राष्ट्रवादी/यशवंत विकास), सागर लादे (अपक्ष), संकेत पवार (अपक्ष), जावेद शेख (काँग्रेस)

प्रभाग ४ ब : आनंद लादे (काँग्रेस/अपक्ष), महेश कांबळे (लोकशाही आघाडी), सिद्धार्थ थोरवडे (यशवंत विकास)

प्रभाग ५ अ : रेवती बर्गे (भाजप), स्नेहल कदम (यशवंत विकास), मिनाज सुतार (काँग्रेस/अपक्ष), अरुणा पाटील (लोकशाही आघाडी), रजनी शिंदे (भाजप)

प्रभाग ५ ब : राजेंद्र कांबळे (नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार गट/अपक्ष), अशोक सूर्यवंशी (यशवंत विकास/शिवसेना), आशुतोष कात्रे (अपक्ष), सुरेश लादे (लोकसेवा आघाडी), सागर लादे (भाजप), योगेश लादे (काँग्रेस)

प्रभाग ६ अ : साजिदा मुल्ला (यशवंत विकास/शिवसेना), वहिदा इनामदार (अपक्ष), शारदा माने (भाजप), सुनंदा माने (भाजप)

प्रभाग ६ ब : राहील मुतवल्ली (अपक्ष), आलेज मुतवल्ली (काँग्रेस), अल्ताफ शिकलगार (यशवंत विकास)

प्रभाग ७ अ : वंदना गायकवाड (अपक्ष), तेजश्री पाटसकर (अपक्ष), गायत्री कुंभार (भाजप), प्रिया आलेकरी (यशवंत विकास)

प्रभाग ७ ब : विनायक मोहिते (अपक्ष), मन्सूर खैरतखान (अपक्ष), अभिषेक बेडेकर (लोकशाही आघाडी), दीपक पाटील (भाजप)

प्रभाग ८ अ : शालिनी शाह (भाजप/अपक्ष), सुनीता साळुंखे (यशवंत विकास/शिवसेना), देवयानी डुबल (शिवसेना/यशवंत विकास)

प्रभाग ८ ब : विजय वाटेगावकर (भाजप), संजय चन्ने (शिवसेना/यशवंत विकास)

प्रभाग ९ अ : साजिदा मुल्ला (यशवंत विकास/शिवसेना), शमीमा बागवान (जनशक्ती), विजया पवार (शिवसेना/यशवंत विकास/अपक्ष), शैनाज मुजावर (जनशक्ती), नाजीया पटवेकर (काँग्रेस/अपक्ष)

प्रभाग ९ ब : आशुतोष जाधव (जनशक्ती), जयंत जाधव (जनशक्ती), हणमंत पवार (शिवसेना/यशवंत विकास), समीर पटवेकर (काँग्रेस/अपक्ष), विक्रम जाधव (काँग्रेस)

प्रभाग १० अ : मनीषा घाडगे (काँग्रेस/अपक्ष)

प्रभाग १० ब : नागेश कुरले (अपक्ष), सुमित जाधव (भाजप), फैयाज कागदी (अपक्ष), प्रताप इंगवले (शिवसेना/अपक्ष), यशराज सुर्वे (लोकशाही आघाडी), समाधान चव्हाण (अपक्ष), ऋतुराज मोरे (काँग्रेस/यशवंत विकास)

प्रभाग ११ अ : शुभांगी भोसले (लोकशाही आघाडी), सुनीता तपासे (भाजप)

प्रभाग ११ ब : अजित भोसले (अपक्ष), भानुदास धोत्रे (अपक्ष), गणेश पवार (अपक्ष), योगेश वेल्हाळ (शिवसेना शिंदे गट), विनायक वेल्हाळ (शिवसेना शिंदे गट)

प्रभाग १२ अ : पूजा केंगार (भाजप/शिवसेना), स्मिता धोत्रे (भाजप), तेजस्विनी कुंभार (यशवंत विकास), नसरीन शेख (अपक्ष), माधुरी पवार (यशवंत विकास/अपक्ष), छाया घोडके (भाजप), सरिता हरदास (भाजप)

प्रभाग १२ ब : इंद्रजीत गुजर (भाजप), फैयाज कागदी (अपक्ष), राकेश पवार (यशवंत विकास), अनिस मुलाणी (अपक्ष), किसन चौगुले (अपक्ष), श्रीकांत घोडके (अपक्ष)

प्रभाग १३ अ : शहनाज मुलाणी (यशवंत विकास/काँग्रेस/अपक्ष), तनुजा मुलाणी (काँग्रेस/यशवंत विकास/अपक्ष)

प्रभाग १३ ब : किरण पाटील (शिवसेना/यशवंत विकास), पोपट शिंदे (शिवसेना/यशवंत विकास), अमरजीत राजपुरे (काँग्रेस/अपक्ष)

प्रभाग १४ ब : किरण सूर्यवंशी (शिवसेना/यशवंत विकास), इंद्रजीत भोपते (शिवसेना/यशवंत विकास/काँग्रेस), सचिन पवार (भाजप)

प्रभाग १५ अ : पुनम घेवदे (भाजप), प्राजक्ता घेवदे (भाजप), योगिता जगताप (अपक्ष), गीता पाटसुपे (अपक्ष/राष्ट्रवादी), शिला रसाळ (अपक्ष), दया गायकवाड (अपक्ष), सुजाता गायकवाड (अपक्ष)

प्रभाग १५ ब : अमीर हुसेन मुल्ला (अपक्ष/काँग्रेस), मोहसीन आंबेकरी (अपक्ष), अख्तर आंबेकरी (अपक्ष/लोकशाही आघाडी), श्रीधर फुटाणे (अपक्ष), अखिल आंबेकरी (अपक्ष/यशवंत विकास), नईम पठाण (अपक्ष)

प्रभाग १५ क : हसीना मुल्ला (अपक्ष/काँग्रेस), तेजस्वी खराडे (अपक्ष), सुप्रिया खराडे (अपक्ष), मंदा खराडे (अपक्ष), संगीता शिंदे (भाजप), सुवर्णा खराडे (काँग्रेस)


एकूण २६ उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल झाले.


---

उद्या छाननी – निवडणूक प्रक्रियेत टप्पा महत्वाचा

दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता
स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र, शनिवार पेठ, कराड येथे होणार आहे.

नगराध्यक्ष पदाची छाननी प्रथम तर त्यानंतर प्रभाग १ ते १५ या क्रमाने नगरसेवक पदांची छाननी केली जाणार आहे.
उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार