४१ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! खोडशी गेटेड बंधाऱ्यासाठी ₹ २.६४ कोटींचा निधी; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी; उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश
कराड, ता. २७ : विद्या मोरे; कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खोडशी (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील नवीन गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी राज्य सरकारने ₹२ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा निर्णय घेतला असून, प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ४१ वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी खोडशी गावाजवळील कृष्णा नदीवर ब्रिटिश काळात सन १८६७ मध्ये बंधारा उभारण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे कृष्णा कालव्याद्वारे कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यातील सुमारे ८,९७२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. मात्र जुन्या बंधाऱ्याचे आयुष्यमान संपत आल्याने १९८५ मध्ये नवीन गेटेड बंधाऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. चार दशकांहून अधिक काळ लोटूनही हे काम अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम होती. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सातत्यपूर्ण प...