कराड नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण — प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांचे सुक्ष्म नियोजन आणि स्पष्ट सूचना!

 
कराड : विद्या मोरे 

कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व स्तरांवरील तयारी पूर्ण केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले. त्यांनी सर्व नियुक्त पथक प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना “दिलेलं काम जबाबदारीने, काळजीपूर्वक, वेळेत आणि अचूकपणे पार पाडा” असे स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. रोहिणी शिंदे, नायब तहसीलदार युवराज पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, बाबुराव राठोड, आणि व्ही. आर. राजपूत उपस्थित होते.

 निवडणुकीत टीमवर्कवर भर

प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, “निवडणुकीचे काम हे केवळ एक जबाबदारी नाही, तर लोकशाहीची प्रतिष्ठा जपण्याचे कर्तव्य आहे. प्रत्येक विभागाने एकत्रित व सामूहिक जबाबदारीने टीमवर्क म्हणून हे काम पार पाडावे. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान कराड तालुक्याची उत्कृष्ट कामगिरी झाली होती; त्याच धर्तीवर या निवडणुकीतही आदर्श निर्माण करायचा आहे.”

प्रशिक्षणांचे वेळापत्रक निश्चित

या निवडणुकीसाठी नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यांतील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे 

पहिले प्रशिक्षण: 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, टाऊन हॉल, कराड

दुसरे प्रशिक्षण: 23 नोव्हेंबर 2025 रोजी, टाऊन हॉल, कराड

तिसरे प्रशिक्षण: 1 डिसेंबर 2025 रोजी, बहुउद्देशीय हॉल, कराड


नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या आदेशासोबत टपाली मतपत्रिका मागणी फॉर्म देखील देण्यात येणार आहे.

 *सूक्ष्म नियोजन आणि विविध कक्षांची स्थापना* 

निवडणुकीचे नियोजन पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी विविध कक्ष आणि पथके स्थापन केली आहेत. त्यामध्ये पुढील विभागांचा समावेश आहे 

आचारसंहिता कक्ष

एक खिडकी योजना

निवडणूक निरीक्षक आणि नियंत्रण मदत कक्ष

कायदा व सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था

वाहतूक आणि दळणवळण विभाग

साहित्य वाटप आणि नियोजन

संगणक व तांत्रिक कक्ष

कार्यालयीन साहित्य वाटप पथक

भोजन व्यवस्था आणि प्रशिक्षण शाखा

लेखा शाखा

मतदान जनजागृती (स्वीप पथक)

वैद्यकीय सहाय्यता व कल्याण पथक

माध्यम कक्ष

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समन्वय कक्ष

सेक्टर ऑफिसर व बीएलओ समन्वयक कक्ष

ईव्हीएम नियंत्रण आणि पत्रव्यवहार कक्ष

म्हेत्रे यांनी सांगितले की, “या सर्व विभागांमधील समन्वय आणि अचूक कार्यप्रणाली हीच पारदर्शक निवडणुकीची गुरुकिल्ली आहे.”

 *कराड तालुका मतदान जनजागृतीत अव्वल!* 

कराड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली आणि भव्य रांगोळी प्रदर्शन आयोजित केले. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

राज्यातील अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच कराड तालुक्यात सुरू झाल्याचा उल्लेख करत प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, “मतदार जनजागृतीत कराड तालुका अव्वल ठरला असून, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही पुढाकार घ्यावा.”

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार