मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजअखेर एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल
कराड /दिनांक १३ नोव्हेंबर /विद्या मोरे
मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक १३ नोव्हेंबरअखेर नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी १५ असे एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी सुनंदा तानाजी साठे यांनी भारतीय जनता पार्टी कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभागनिहाय अर्जांची स्थिती पुढीलप्रमाणे—
-
प्रभाग १:
- सर्वसाधारण जागा – नितीन (नारायण) विष्णुपंत काशीद पाटील (अपक्ष)
- सर्वसाधारण जागा – शहाजी आनंदराव पाटील (भाजप)
-
प्रभाग २:
- सर्वसाधारण महिला जागा – गीतांजली शहाजी पाटील (भाजप)
- सर्वसाधारण जागा – विक्रम अशोक चव्हाण (भाजप)
-
प्रभाग ३:
- सर्वसाधारण महिला जागा – रंजना अशोक पाचुंदकर (भाजप)
-
प्रभाग ४:
- अनुसूचित जाती जागा – सचिन संपत खैरे (भाजप)
- सर्वसाधारण महिला जागा – कल्पना नारायण रैनाक (भाजप)
-
प्रभाग ५:
- सर्वसाधारण जागा – मधुकर महादेव शेलार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
- सर्वसाधारण जागा – तानाजीराव संभाजी देशमुख (भाजप)
- सर्वसाधारण जागा – राजेंद्र प्रल्हाद यादव (भाजप)
-
प्रभाग ७:
- सर्वसाधारण जागा – संभाजी मारुती रैनाक (भाजप)
-
प्रभाग ८:
- अनुसूचित जाती महिला राखीव जागा – गीता नंदकुमार साठे (भाजप)
-
प्रभाग १०:
- नागरिक मागास प्रवर्ग जागा – वसीम शब्बीर मुल्ला (भाजप)
-
प्रभाग ११:
- सर्वसाधारण महिला जागा – राजश्री नितीन जगताप (भाजप)
- सर्वसाधारण जागा – मनोहर भास्करराव शिंदे (भाजप)
या सर्व अर्जांची माहिती मलकापूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप आणि सहाय्यक ज्ञानदेव साळुंखे यांनी पत्रकारांना दिली.
Comments
Post a Comment