कराडमध्ये मतदानाची महत्त्वाची हाक: शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली जागृती रॅली*
कराड, विद्या मोरे. नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मदतीने कराड तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकाने शनिवारी शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक प्रभावी मतदार जागृती रॅली आयोजित केली. वार्ड क्रमांक ७ आणि ८ मधून निकाली काढण्यात आलेली ही रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.
महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातात जागृती संदेश असलेले फलक घेत "मतदान करा", "आपले मत, आपला हक्क" अशा घोषणांसह रॅली काढली. या उपक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक लादे, ज्येष्ठ शिक्षक शशिकांत शिंदे, राजेंद्र ठाकरे, संदीप घुलूम, प्रदीप पाटील आणि स्वीप पथकातील सुनील परीट, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे उपस्थित होते.
दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक शाळेतही मतदार-जागृती उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगताना संतोष डांगे यांनी लोकशाहीत प्रत्येक मताची किंमत स्पष्ट केली. यानंतर ऋषिकेश पोटे यांनी विद्यार्थ्यांकडून मतदार-जागृतीची प्रतिज्ञा घेतली. शाळेच्या वतीने मतदान-जागृतीच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली.
या कार्यक्रमात मुख्याध्यापक नारायण जगताप, सुनिता पाटील, स्वाती वीर, भाग्यरेखा जंत्रे यांसह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंदराव जानुगडे यांनी मानले.
Comments
Post a Comment