कराड उत्तर : एका वर्षात ७६० कोटी निधी — पाच वर्षांत ५ हजार कोटींचा संकल्प : आमदार मनोजदादा घोरपडे
कराड उत्तर मतदारसंघात एका वर्षात तब्बल ७६० कोटींचा निधी आणण्यात यश मिळाले असून ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने मतदारांना मोठी भेट असल्याचे मत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले. पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटींचा निधी आणण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला.
मसूर येथील १ कोटी २३ लाख ६५ हजारांच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी दूध संघ अध्यक्ष संपतराव इंगवले, माजी जि.प. सदस्य नंदकुमार जगदाळे, दिनकरराव पाटील, युवा नेते कुलदीप क्षिरसागर, पवन निकम, ओंकार जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार घोरपडे यांचे प्रतिपादन
ते म्हणाले की,
- मसूर व्यापारी पेठेला जोडणाऱ्या जुन्या पुलासाठी ३–४ कोटी निधी येत्या अर्थसंकल्पात मंजूर करून घेतला जाईल.
- कराड उत्तरमधील इंचानइंच जमीन ओलिताखाली आणणे हा माझा शब्द आहे.
- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागा एकाच विचारांच्या पक्षाच्या झोळीत टाकण्याचा निर्धार.
ते पुढे म्हणाले, “गत ३५–४० वर्षे हणबरवाडी धनगरवाडी योजना ऐकत होतो. पण एका वर्षात तिला गती दिली असून पहिल्या टप्प्याचे पाणी लवकरच सुरू होईल.”
स्थानिक मागण्यांचा धांडोळा
प्रास्ताविक भाषणात जयवंत जगदाळे यांनी ग्रामीण रुग्णालय, जुन्या बाजारपेठेला जोडणारा पूल, बाजारपेठ–स्मशानभूमी रस्ता आणि स्ट्रीटलाइट आदी मागण्या मांडल्या. यावेळी दिनकरराव पाटील, उमेश साळुंखे, नंदकुमार जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- मसूरमध्ये रस्ता रुंदीकरणात कोणतीही इमारत किंवा दुकान तोडले जाणार नाही.
- शामगाव घाट काँक्रिटीकरण होणारा महाराष्ट्रातील एकमेव घाट.
- मसूर परिसरात राष्ट्रवादी–काँग्रेसला धक्का, दररोज कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
- एका वर्षात ४४ हजार मतांचे लीड दिल्याबद्दल मतदारांचे आभार — “आता जुनी पाळेमुळे उपटण्याची जबाबदारी माझी.”
- जिल्हा परिषद व पंचायत समिती एकास एक लढत.
- २१ जनता दरबारात ५ हजार प्रशासकीय तक्रारी निकाली; पाच वर्षांत २५ हजार तक्रारी सोडवण्याचे लक्ष्य.
- पाणी योजनेचे ८१% बिल सरकार भरणार; १९% फक्त लाईटबिलासारखे द्यायचे.
- हणबरवाडी आणि धनगरवाडी योजनेचे पहिले टप्पे लवकरच.
- दोन वर्षांत ११ पाणी योजनांसाठी ७००–८०० कोटी निधी आणणार.
- कराड उत्तरमधील प्रत्येक इंच जमीन ओलिताखाली.
- पाणी वाटप व्यवस्थापनासाठी प्रत्येक सोसायटीला स्वतंत्र ऑफिस.
- रहिमतपूर नगरपालिकेत २१–० असा विजय निश्चित — असा आत्मविश्वास.
- “वरिष्ठांसोबत तरुणांची मोठी फळी ही भविष्यातील विजयाची नांदी.”
चर्चेतील दोन महत्त्वाचे मुद्दे
१. राष्ट्रवादी–काँग्रेसला सोडचिठ्ठी
वडोली भिकेश्वर गणातील कोणेगाव व कवठे गावातील अनेक नेत्यांचा प्रमुख सहभाग असलेला मोठा भाजप प्रवेश कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला.
२. मसूर जिल्हा परिषद गट – एकनिष्ठ उमेदवाराचा आग्रह
अनेक इच्छुक असले तरी सर्वांनी एकत्र येऊन एकमताने एकच नाव सुचवावे, असा सल्ला आमदार घोरपडे यांनी दिला. “तीन–चार जणांना पंचायत समितीत समाविष्ट करता येईल; कुणाचाही अपमान होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment