कराडमध्ये लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीची भव्य संयुक्त जाहीर सभा
कराड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीने एकत्र येत संयुक्त लढाई जाहीर केली असून, या दोन्ही आघाड्यांतील सर्व उमेदवार तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. राजेंद्रसिंग यादव यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण सभेस राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व ‘लाडकी बहीण’ योजनेचे जनक मा. ना. एकनाथराव शिंदे हे प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबतच पालकमंत्री व शिवसेनेचे दमदार नेते मा. ना. शंभूराज देसाई तसेच आघाडीचे मार्गदर्शक आणि सहकारमंत्री मा. बाळासाहेब पाटील हेही सभेत मार्गदर्शन करीत नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
सभा अधिक प्रभावी करण्यासाठी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख गणेश कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष मा. जयंत पाटील, तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. राजेंद्रसिंग यादव यांची उपस्थिती राहणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा कराडच्या राजकीय वातावरणात विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
ही जाहीर सभा शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वा., कन्याशाळा, मंगळवार पेठ, कराड येथे आयोजित करण्यात आली आहे. कराड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संयुक्त आघाड्याच्या उमेदवारांना उत्साह देण्याचे आवाहन आघाड्यांतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment