विद्यार्थ्यांची मतदार-जागृती रॅली कराडमध्ये उत्साहात; पथनाट्याने दिला ‘मतदान एक कर्तव्य’चा जोरदार संदेश

 

कराड : विद्या मोरे

कराड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागरूकतेचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून श्री संत तुकाराम हायस्कूल, कराड यांच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. शुक्रवार पेठ परिसरातून निघालेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे जाणवत होती.

विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थीनींनी सादर केलेले प्रभावी पथनाट्य. ‘मतदान एक कर्तव्य’ या विषयावर आधारित हे पथनाट्य नागरिकांना मतदानाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे ठरले. चौकाचौकांत जमलेल्या गर्दीने पथनाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी स्वीप पथकाचे आनंदराव जानुगडे यांनी विद्यार्थ्यांकडून शतप्रतिशत मतदानासाठी शपथ घेतली. तसेच संतोष डांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “प्रत्येक नागरिकाला मतदानास प्रवृत्त करण्यासाठी जागृतीची साखळी अधिक मजबूत व्हावी” असे सांगत मतदान प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले.

उपक्रमावेळी स्वीप पथकाचे सुनील परीट, ऋषिकेश पोटे, मुख्याध्यापिका सुजाता भालेराव, माधवी काशीद, वैशाली देसाई, साजिता मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या सामाजिक जाणीव जागृती उपक्रमामुळे कराड शहरात सकारात्मक संदेश पोहोचला असून विद्यार्थ्यांचा पुढाकार प्रशंसनीय ठरला आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार