शिवसेना व यशवंत आघाडीच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

  


कराड —विद्या मोरे 
शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष मा. राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात कराड नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना व यशवंत विकास आघाडीची भूमिका निश्चित केली जाणार असून, आगामी निवडणुकीसाठी रणनीती आणि संघटनात्मक तयारीवरही सविस्तर चर्चा होणार आहे.

या मेळाव्याला शिवसेना जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, प्रीतम यादव, निशांत ढेकळे, गजेंद्र कांबळे, ओमकार मुळे, बाळासाहेब यादव, राहुल खराडे, विनोद भोसले, किरण पाटील, माजी नगराध्यक्षा सौ.संगिता देसाई, आनंदराव देसाई, सचिन पाटील, विजयसिंह यादव, शहर प्रमुख राजेंद्र माने, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सुलोचना पवार, चांदनी ताई पवार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा मेळावा रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. सारडा लॉन्स, पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड येथे पार पडणार आहे.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार