लायन्स क्लब मसूरची उपक्रमशील परंपरा कायम; जागतिक दिव्यांग दिनी प्रतिभावंत वकील अॅड. रणजीतसिंह जगदाळे यांचा सत्कार
कराड: विद्या मोरे
जागतिक दिव्यांग दिन आणि वकील दिनाचा अपूर्व संगम असलेल्या आजच्या दिवशी, समाजकार्यात सतत पुढाकार घेत असलेल्या लायन्स क्लब मसूरतर्फे मसूर येथील प्रतिभावंत व समाजाभिमुख वकील अॅड. रणजीतसिंह जगदाळे यांचा त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
लायन्स क्लब मसूरने सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवत, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याच अनुषंगाने न्यायव्यवस्थेतल्या निष्ठावंत सेवेसाठी आणि समाजहितासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत अॅड. जगदाळे यांना आज हा मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास लायन्स क्लब मसूरचे अध्यक्ष लायन डॉ. रमेश लोखंडे, माजी प्रांतपाल पी.एम.जे.एफ. लायन जगदीश पुरोहित, लायन जितेंद्र निकम, तसेच जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्याध्यक्ष लायन दिलीप पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी अॅड. जगदाळे यांच्या कार्याचा गौरव केला असून त्यांनी गावासाठी केलेल्या कायदेशीर योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
सत्कार स्वीकारताना अॅड. रणजीतसिंह जगदाळे यांनी लायन्स क्लबच्या प्रेमळ सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“लायन्स क्लब मसूरच्या सदस्यांनी दाखवलेला सन्मान हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्याची उर्मी या सत्कारातून मिळाली,” असे त्यांनी सांगितले.
लायन्स क्लब मसूरचे विविध उपक्रम, सामाजिक संवेदनशीलता आणि समाजातील मान्यवरांचा गौरव करण्याची परंपरा आजच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
Comments
Post a Comment