पवार साहेबांच्या हस्ते कर्नल संभाजी पाटील यांना ऐतिहासिक तेलचित्राचे प्रदान

 
कराड : विद्या मोरे 
१९८८ साली राजस्थान-जामनगर येथे महामहिम राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांचे स्वागत करताना स्टेशन कमांडर कर्नल संभाजी पाटील — हा ऐतिहासिक क्षण जेष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांनी आपल्या कुंचल्यातून अप्रतिम रेखाटला आहे.

हे स्मरणीय तेलचित्र भारताचे माजी संरक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते कर्नल संभाजी पाटील यांना प्रदान करण्यात आले.

तेलचित्र प्रदान सोहळा शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता, पवार साहेबांच्या पुणे येथील कार्यालयात मोठ्या औत्सुक्याने संपन्न झाला.

या प्रसंगी प्रा. भगवान खोत तसेच चित्रकार कुमारी भाग्यश्री सुतार यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रम दरम्यान पवार साहेबांनी जेष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांच्या उत्कृष्ट कलाकृतीचे मनापासून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार