प्रियदर्शनी विकास सेवा सोसायटीच्या नवीन कर्ज वाटपास शुभारंभ

 
कराड : विद्या मोरे
कराड येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मार्केट यार्ड शाखा येथे प्रियदर्शनी विकास सेवा सोसायटीच्या नवीन कर्ज वाटपास आज अधिकृत शुभारंभ करण्यात आला. शेतकरी, व्यापारी व सभासदांच्या आर्थिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने या कर्ज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शुभारंभ प्रसंगी संस्थापक चेअरमन श्री. अशोकराव पाटील (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्हाईस चेअरमन श्री. सुरेशराव शिंदे (बाबा) यांच्यासह संचालक मंडळातील श्री. दत्तात्रय तुकाराम पाटील, श्री. नारायण घळसासी, श्री. संभाजीराव शेजवळ, श्री. राजेंद्र जाधव, श्री. सागर पाटील तसेच सर्व संचालक व सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विकास अधिकारी मा. श्री. अमित काळे, मार्केट यार्ड शाखेच्या शाखाप्रमुख श्रीमती शेलार मॅडम, बँकेचे सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते. सोसायटीचे सचिव श्री. अमोल गुरव व श्री. संतोष शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, प्रियदर्शनी विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना वेळेवर व सुलभ कर्जपुरवठा करून त्यांच्या आर्थिक प्रगतीस चालना देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न राहील. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे सोसायटी सामाजिक व आर्थिक विकासासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रम शांततामय वातावरणात व उत्साहात पार पडला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार