ग्रामविकासाला गती देणारे सचिवालय गोटे गावात साकार;माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन, व सौ. सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त काँग्रेसचा भव्य मेळावा**
कराड : विद्या मोरे
गोटे ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुसज्ज व आधुनिक सचिवालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त माननीय सौ. सुनंदा नामदेव पाटील माई यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व काँग्रेसचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा संयुक्त कार्यक्रम शनिवार, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता गोटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांतून ग्रामपंचायत सचिवालयासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला होता. त्या निधीतून आधुनिक सुविधा, प्रशासकीय सोयीसह सुसज्ज अशी नवी इमारत उभारण्यात आली असून, या सचिवालयामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होणार आहे. ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली सहज उपलब्ध होणार असल्याने प्रशासन व नागरिकांमधील दुवा अधिक मजबूत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमास माननीय उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून माननीय नामदेवराव पाटील व माननीय अजितराव पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच गोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच वहिदा शेख, उपसरपंच कोमल लादे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभानंतर सौ. सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या निमित्ताने आयोजित काँग्रेसच्या भव्य मेळाव्यामुळे जिल्हा परिषद गटासह संपूर्ण परिसरात राजकीय, सामाजिक व विकासात्मक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment