स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांचा सहकारवारसा कायम; रयत बायोशुगरमध्ये नलावडे–थोरात यांची बिनविरोध फेरनिवड

 
कराड : विद्या मोरे.                                                      रयत सहकारी बायोशुगर संस्था मर्यादित, कराड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक शांततेत व एकमताने बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी तानाजीराव नलावडे (पार्ले) तर उपाध्यक्षपदी धनंजय थोरात (कालवडे) यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. कोणताही वाद, तणाव किंवा विरोध न होता झालेली ही निवड सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत लोकशाहीचे उदाहरण ठरली.

कोयना–रयत समूहाशी संलग्न असलेली ही संस्था स्व. लोकनेते विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झाली असून, त्यांच्या सहकारविचारांचा वारसा आजही संस्थेच्या कार्यपद्धतीतून दिसून येतो. सध्या संस्थेचे कामकाज ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संस्थेचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नसले, तरी भविष्यात कारखाना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व नियोजनात्मक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत, पारदर्शक व विकासाभिमुख धोरण राबवण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या बिनविरोध निवडीबद्दल ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर), आदिराज पाटील (उंडाळकर) यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.

यावेळी संचालक राजेंद्र पाटील, भाऊसो मंडले, अधिकराव जगताप, अविनाश पाटील, विश्वास कणसे, विश्वनाथ नांगरे, महादेव मोरे, तानाजी जाधव, चंद्रकांत पवार, कृष्णा माने, रामचंद्र पातले, नागेश मोरे, नामदेव रामिष्ठे, अजित पाटील, रेखा कचरे, हेमा पारवे तसेच संस्थेचे सचिव शामराव जांभळे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार