राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून बाळासाहेब पाटील यांच्यावर इचलकरंजी महापालिका निवडणुकांची धुरा

 
कराड : विद्या मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची इचलकरंजी महापालिका निवडणुकांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली.

राज्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रभार्‍यांची घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

अलीकडेच कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विजय मिळवला. निवडणूक आखणी, संघटनबांधणी आणि समन्वय या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाची दखल घेऊनच त्यांना ही महत्वाची जबाबदारी सोपवली गेल्याचे सांगितले जाते.

इचलकरंजी महापालिका ही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या प्रभावी मानली जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच, उमेदवारांमध्ये योग्य समन्वय साधणे आणि प्रभावी प्रचारयोजना राबवणे ही जबाबदारी ते पार पाडणार आहेत.

या निवडीबद्दल पक्षाध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार