सत्कार समारंभ नंतर नितीन भिमराव ढापरे यांचे मनापासून आभार प्रदर्शन

 
कराड : विद्या मोरे 

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल कराड तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी आयोजित केलेल्या भव्य सत्काराबद्दल नितीन भिमराव ढापरे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हॉटेल शिवनेरी येथे झालेला हा कार्यक्रम आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनी दिलेला सन्मान, आपुलकी आणि प्रेम आयुष्यभर जपून ठेवेन, अशी भावना ढापरे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून मार्गदर्शन करणारे रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील दादा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून प्रेरणा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सारंगबाबा पाटील यांचे ढापरे यांनी विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाची संकल्पना व आयोजनात पुढाकार घेतलेल्या विकासजी भोसले, साम मराठीचे ब्युरो चीफ संभाजीबाबा थोरात, लोकमत कराडचे कार्यालय प्रमुख प्रमोद सुकरे सर यांच्या प्रेम आणि बांधिलकीची नितीन ढापरे यांनी प्रशंसा केली. तसेच कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या संदीप चेणगे (मुक्तागिरी), अशोक मोहने (पुढारी), प्रमोदअण्णा तोडकर (न्यूज लाईन) यांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन करणारे अभयजी देशमुख आणि प्रभावी आभार प्रदर्शन करणारे ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ कुंभार सर यांचे ढापरे यांनी विशेष कौतुक केले. यावेळी मनोगत व्यक्त करणारे प्रमोद सुकरे सर, बालिशजी थोरात, शशिकांत पाटील सर, संभाजीबाबा थोरात, विशालराव पाटील, दिनकरराव थोरात, सुहास पाटील, आनंदराव थोरात, दिलीप माने सर, गजानन गिरी सर, बाळकृष्ण गुरव सर, उमेशजी सूर्यवंशी, अमोलजी जाधव, तानाजीभाऊ देशमुख, विद्याधरजी गायकवाड, विजयदादा पाटील, सचिनदादा देशमुख, अकबर शेख सर, प्रदीप रेवळेकर सर, हैबतनाना आडके, दीपक पवार सर, अतुलजी होनकळसे, ज्ञानेश्वरजी शेवाळे, वसिमजी सय्यद, सरफराजजी मुल्ला, तन्मयजी पाटील या सर्वांचेही ढापरे यांनी मनापासून आभार मानले.

प्रमोद तोडकर यांनी केलेली प्रभावी प्रस्तावना आणि संदीप चेणगे यांनी केलेले सन्मानपत्राचे भावनिक वाचन कार्यक्रमाला विशेष अर्थपूर्णता देणारे होते, असे ते म्हणाले.

या विशेष दिवशी कुटुंबीयांची उपस्थिती मोठी प्रेरणा असल्याचे सांगताना ढापरे यांनी आई संघमित्रा ढापरे, पत्नी सुजाता, कन्या आदिती, राजवी (माई), चुलते पंडित ढापरे (नाना), भाऊ सुजितकुमार, भाऊजी जितेंद्र कांबळे, बाजार समितीचे संचालक संभाजीदादा चव्हाण, गणपतराव पाटील, कोयना दूध संघाचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव (मामा), माजी सैनिक उत्तमराव मोहिते (फौजी बापू) यांचेही मनापासून आभार व्यक्त केले.
कार्यक्रमातील प्रत्येक क्षण टिपणारे हारून मुलाणी, एस.के. मामा, संदीप पाटील, सौ. विद्या मोरे मॅडम, सागर गिरी, अक्षय मस्के, सकलेन मुलाणी यांच्या मेहनतीचे ढापरे यांनी विशेष उल्लेख केला. त्यांच्या जतन केलेल्या छायाचित्रांना त्यांनी “आयुष्यभराचा ठेवा” असे संबोधले.

कार्यक्रमानंतर उत्तम व्यवस्था करणारे संभाजी थोरात बाबा आणि हॉटेल शिवनेरीचा संपूर्ण स्टाफ यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले. काही मान्यवर आणि पत्रकार बांधव पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नसले तरी दूरध्वनी आणि सोशल मीडियातून दिलेल्या शुभेच्छांसाठी ढापरे यांनी त्यांचेही आभार मानले.
ढापरे म्हणाले,
“आपण दिलेला सन्मान माझ्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या अधिक दृढ करणारा आहे. शेतकरी बांधवांच्या विकासासाठी, बाजार समितीच्या प्रगतीसाठी आणि कराड तालुक्याच्या हितासाठी मी संपूर्ण ताकदीनिशी काम करत राहणार आहे. कोणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर क्षमस्व. आपले प्रेम आणि पाठबळ असेच कायम राहू दे.”

शेवटी त्यांनी सर्वांचा मनःपूर्वक, हृदयपूर्वक आभार मानून आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार