सातारा जिल्हा वार्षिक क्रॉस कंट्री स्पर्धेचे कराड येथे आयोजन

       मा. पांडुरंग शिंदे.            मा.शशिकांत पाटील

कराड  : विद्या मोरे 
सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारी वार्षिक क्रॉस कंट्री स्पर्धा 2025 ही दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता कराड तालुक्यातील आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन साई स्पोर्ट्स फाऊंडेशन, कराड यांच्या वतीने करण्यात येत असून जिल्ह्यातील नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंना सहभागाची संधी मिळणार आहे. स्पर्धा 16, 18, 20 व खुला गट मुले-मुली अशा वयोगटात घेण्यात येणार असून 14 वर्षांखालील मुले-मुलींसाठी नवोदित खेळाडूंचा विशेष गट ठेवण्यात आला आहे.

या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.

या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील नवोदित व अनुभवी खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन साई स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सचिव व राष्ट्रीय खेळाडू श्री. शशिकांत पाटील यांनी केले आहे.

ही स्पर्धा लायन्स क्लब कराड सिटी, ट्रॉफी हाऊस कराड व साई स्पोर्ट्स यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार