मसूरमध्ये सुरू झालेअत्याधुनिक ‘मसूर हॉस्पिटल अ‍ॅण्ड आय.सी.यू.’ग्रामीण भागातील रुग्णसेवेला नवे बळ

 
कराड  : विद्या मोरे
मसूर परिसरातील रुग्णांची वाढती गरज ओळखून येथील डॉक्टर बंधूंनी एकत्र येत उभे केलेले ‘मसूर हॉस्पिटल अ‍ॅण्ड आय.सी.यू. सेंटर’ ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचारसेवा देईल, असा विश्वास राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

मसूर–उंब्रज रोडवरील या नूतन हॉस्पिटलच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी जि.प. सदस्य नंदकुमार जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब जगदाळे, ला. जगदीश पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री पाटील म्हणाले,
“आजच्या गतिमान जीवनशैलीमुळे आणि रासायनिक खते व औषधांच्या वापरामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी आतापर्यंत पुणे, मुंबई, मिरज किंवा कराड येथे धाव घ्यावी लागत होती. अशावेळी मसूरसारख्या शहरात अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात आल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळेल.”

हॉस्पिटलने उत्तम सेवा देत नावलौकिक कमवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

यानंतर मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार जगदाळे आणि ला. जगदीश पुरोहित यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.
ला. जगदीश पुरोहित म्हणाले, “हे हॉस्पिटल म्हणजे केवळ उपचाराचे केंद्र नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी मानून उभा केलेला उपक्रम आहे. विश्वास, काळजी, आधार आणि माणुसकी या तत्वांवर आधारित सेवा देत ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

प्रास्ताविकपर भाषणात डॉ. संजय देसाई म्हणाले,
“विश्वास, काळजी, आधार आणि माणुसकी या भावनेतून चार भिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या आमच्या डॉक्टरांनी एकत्र येत हे हॉस्पिटल सुरू केले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून आमचा संपूर्ण स्टाफ २४x७ कार्यरत राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय माने यांनी केले तर ला. रमेश जाधव यांनी आभार मानले.
मसूर व पंचक्रोशीतून नागरिक, मान्यवर व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 विशेष भेट

सायंकाळी पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही हॉस्पिटलला भेट देत शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, “मसूर व परिसरातील जनतेची अत्यंत निकड या हॉस्पिटलमुळे पूर्ण झाली आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आदर्शवत कार्य करावे.”

 मानवतावादी संदेश

“रुग्णांशी जिव्हाळ्याने बोलले तरी निम्मा आजार बरा होतो” — माजी मंत्री बाळासाहेब पाटील

निमंत्रणपत्रिकेतील विश्वास–काळजी–आधार–माणुसकी या सूत्राचा उल्लेख करत ते म्हणाले —
“रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्याशी जिव्हाळ्याने संवाद साधला, तर ५० टक्के आजार आपोआप दूर होतो. या हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी याच भावनेतून सेवा द्यावी.”

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार