कराडमध्ये ‘होमथॉन 1.0’ भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पोमहिला सन्मान व मेगा लकी ड्रॉचे विशेष आकर्षण
कराड : विद्या मोरे
कराडच्या बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पो ‘होमथॉन 1.0’ नरेडको कराड यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
हा एक्स्पो दि. 23 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत बैल बाजार रोड, गणपती मंदिर शेजारी, मलकापूर, कराड येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती नरेडको कराडचे अध्यक्ष अरविंद खबाले यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार (दि. 23) रोजी सायंकाळी 4.00 वाजता आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यटन व खनिकर्म मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील.
माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच कराड नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मलकापूर नगराध्यक्ष तेजस सोनवले व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या एक्स्पोमध्ये घर, फ्लॅट, प्लॉट, विविध रिअल इस्टेट प्रकल्प तसेच आधुनिक बांधकाम साहित्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
नवीन तंत्रज्ञान, आधुनिक संकल्पना व बांधकाम क्षेत्रातील बदलत्या ट्रेंड्सची माहिती नागरिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
घरखरेदी, प्लॉट गुंतवणूक किंवा बांधकामासाठी इच्छुक नागरिकांना थेट विकसक, उत्पादक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रदर्शनात सहभागी असलेल्या कंपन्यांकडून आकर्षक सवलती व विशेष ऑफर्स देण्यात येणार असल्याने नागरिकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
घर उभारणीत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन महिलांसाठी विशेष सन्मान व मेगा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे.
प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला विनामूल्य कूपन देण्यात येणार आहे.
या मेगा लकी ड्रॉमध्ये
दहा महिलांना ओरिजिनल पैठणी साडी,
तर प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पैठणीसह 1 ग्रॅम सोन्याची नेकलेस देण्यात येणार आहे.
हा मेगा लकी ड्रॉ दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता जाहीर करण्यात येणार असून, कृष्णा उद्योग समूहाच्या प्रमुख आदरणीय सौ. उत्तरा भोसले (आईसाहेब) यांच्या हस्ते सोहळा पार पडणार आहे.
‘होमथॉन 1.0’ हा उपक्रम कराड व परिसरातील नागरिकांसाठी घरखरेदी, बांधकाम साहित्य व गुंतवणुकीची सुवर्णसंधी देणारा ठरेल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले यांनी व्यक्त केला आहे.
हा एक्स्पो कराडच्या बांधकाम क्षेत्राला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेडको कराडचे उपाध्यक्ष सुभाष लोंढे, सचिव संदीप शिंदे, खजिनदार अजित पाटील तसेच संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment