कराडमध्ये हाजी वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्टतर्फे भव्य सत्कार सोहळा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत लोकनियुक्त नगराध्यक्षांचा विकासाचा दृढ संकल्प
कराड : (विद्या मोरे)
कराड शहरातील हाजी वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट, कराड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा अत्यंत सन्मानपूर्वक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराजे देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अॅड. उदयसिंह पाटील, श्री जयंत काका पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि मुस्लिम नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या मान्यवरांच्या सत्काराचा उद्देश — लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींना समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरित करणे — असा असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
आपल्या मनोगतात नगराध्यक्षांनी कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक, पारदर्शक आणि जनहितैषी काम करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
कराडकरांनी दिलेला विश्वास अमूल्य असून तो कधीही डळमळीत होऊ न देता सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच शहराचा विकास हा सर्व समाजघटकांच्या सहभागातूनच शक्य आहे, असे सांगत लोकशाही प्रक्रियेत उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या सोहळ्यात श्री. अल्ताफ शिकलगार, सौ. मिनाज पटवेकर, सौ. रजिया आंबेकरी, श्री. अख्तर हुसेन आंबेकरी, हाजी मजहर भाई कागदी आणि श्री. विजयसिंह यादव यांचा विशेष सत्कार करून त्यांना मानाचा बहुमान देण्यात आला.
कार्यक्रमाला हाजी जैनुद्दीन भादी, इसहाक सवार, मजीद आंबेकरी, हाजी मुनीर बागवान, हाजी बरकत पटवेकर, खैय्याम मुल्ला, साबीरमिया मुल्ला आदी मान्यवरांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडलेला हा भव्य सत्कार सोहळा कराडकरांच्या मनात प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment