भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून जाहीर निषेध विलासराव देशमुखांच्या सन्मानार्थ कराडमध्ये काँग्रेसचे रस्त्यावर आंदोलन
कराड :विद्या मोरे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या तीव्र निषेधार्थ कराड येथे काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. कराड दक्षिण व कराड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हे आंदोलन पार पडले.
भाजप नेत्यांनी दिवंगत लोकनेत्यांविषयी अवमानकारक वक्तव्ये करणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारे असून अशा वक्तव्यांचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी
“विलासराव देशमुख अमर रहे”, “रवींद्र चव्हाण मुर्दाबाद”, “भाजपा मुर्दाबाद” अशा घोषणा देत संताप व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, इतिहासातील योगदान विसरून राजकीय टीका करणे चुकीचे आहे. दिवंगत व सर्वमान्य लोकनेत्यांविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याने समाजात द्वेष निर्माण होतो आणि राजकारणातील सभ्यता धोक्यात येते.
“विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा दिली”
यावेळी बोलताना कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले की,
विलासराव देशमुख यांनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार सांभाळताना ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा उभारणी, सिंचन, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत ठोस व दूरदर्शी निर्णय घेतले. राज्यात औद्योगिक प्रगतीला चालना देत रोजगारनिर्मितीवर भर देण्याचे धोरण त्यांनी राबवले.
मराठवाडा आणि विदर्भातील विकासातील असमतोल दूर करण्यासाठी त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे दुर्लक्षित भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आले, असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाही मूल्यांवरील निष्ठा, शांत आणि सर्वसमावेशकमी नेतृत्वशैली हीच विलासराव देशमुख यांची खरी ओळख असल्याचे सांगत, अशा लोकनेत्यांविषयी अवमानकारक उल्लेख करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान होय, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली केली.
मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग
या आंदोलनात कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसका कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. अमित जाधव, नानासो जाधव, सत्यजीत पाटील, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा वैशालीताई जाधव, उपाध्यक्षा शेवाळे मॅडम, रवि बडेकर, गोल्डन पवार, राहुल पवार, सुरेश भोसले, विजय माने, मुजीर बागवान, उमर सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितराव पाटील म्हणाले :
“लातूरमध्ये जाऊन रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य लातूरची जनता कधीही खपवून घेणार नाही. जशी कराडची ओळख पृथ्वीराज चव्हाण, तशीच लातूरची ओळख विलासराव देशमुख अशी आहे. त्यामुळे अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.”
Comments
Post a Comment