जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंब्रज येथे जाहीर सभा कराड:

 कराड विद्या मोरे 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. ना. एकनाथजी शिंदे यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शेंद्रे, नागठाणे, पुसेसावळी, पाल, मसूर, उंब्रज, सैदापूर व वारुंजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे.

या जाहीर सभेस पालकमंत्री मा. ना. शंभुराज देसाई, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे, कराड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, रणजीत भोसले, चंद्रकांत जाधव तसेच शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. रेश्माताई जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ही जाहीर सभा शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता उंब्रज येथील बाजारतळावर आयोजित करण्यात आली असून, या सभेला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना सातारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार