नगरसेवक श्री. सुहास शिवाजीराव जगताप यांच्या पुढाकारातून सोमवार पेठ कराड येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन.
कराड : विद्या मोरे.
मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त कराड शहरात महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ नंतर कराड शहरातील “दत्तकृपा”, २२६, सोमवार पेठ, कराड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक संस्थेच्या अध्यक्ष मा. सौ. उत्तरा ताई सुरेश भोसले (आईसाहेब) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे स्वागत सौ. कल्पना शिवाजीराव जगताप, सौ. देवयानी सुहास जगताप तसेच सौ. अश्विनी सचिन जगताप या करणार आहेत.
सदर हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन कराड नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. सुहास शिवाजीराव जगताप यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी सौभाग्य, स्नेह आणि सामाजिक एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
परंपरेचे जतन व सामाजिक स्नेहभाव वृद्धिंगत करणाऱ्या या समारंभास कराड शहरासह परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment