राज्य क्रीडा दिनी मूलभूत सुविधांचा अभाव – श्री. सचिन पाटील यांचे मौन उपोषण

 
कराड : विद्या मोरे 
ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा राज्य क्रीडा दिवस हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातील वास्तव परिस्थिती अधोरेखित करणारा दिवस ठरत आहे.

तालुका स्तरावर कार्यरत तालुका क्रीडा संकुल समितीचे सदस्य सचिव यांच्यासाठी बसण्यास टेबल-खुर्चीसारख्या साध्या सुविधा उपलब्ध नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे घडणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
खेळाडू घडवण्यासाठी केवळ घोषणाच नव्हे तर मूलभूत सुविधांची पूर्तता होणे अत्यावश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कार्यालयीन साधनसामग्री आणि क्रीडा प्रशासनाला सक्षम आधार देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री. सचिन पाटील यांनी मौन उपोषण सुरू केले आहे. आजपासून शासनाने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून तालुका स्तरावर क्रीडा सुविधांसाठी ठोस आणि तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार