अकाली निधन: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामुळे राज्यात शोककळा – पृथ्वीराज चव्हाण यांचे संवेदना
कराड: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य व देशात शोककळा पसरली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक असल्याचे सांगितले.
अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि जनहितासाठी समर्पित नेते होते. अलीकडेच झालेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुका, आगामी राज्य अर्थसंकल्प, तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद निवडणूक प्रचार यामध्ये ते सातत्याने सक्रिय होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, "२०१० साली मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते. जवळपास चार वर्षे आम्ही एकत्रितपणे काम केले. काही मतभेद झाले, तरीही ते वित्त विभागाची जबाबदारी पूर्ण प्रभावी पद्धतीने पार पाडत होते. अर्थसंकल्प सादर करण्यात त्यांची कुशलता अप्रतिम होती."
अजित पवार यांना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी व सहकार क्षेत्र यांची सखोल जाण होती, तसेच राज्याचे नेतृत्व करण्याची अपार क्षमता होती.
त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि देशाच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंबीयांप्रती पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र संवेदना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Comments
Post a Comment