कायमस्वरूपी जाळी उभी राहेपर्यंत तात्पुरती सुरक्षा व्यवस्था; नगराध्यक्ष यादव यांच्या सूचनेनंतर रेस्क्यू बोट तैनात
कराड : विद्या मोरे
कराड शहरातील एका संवेदनशील व धोकादायक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी कराड नगरीचे लोकनियुक्त व लोकप्रिय नगराध्यक्ष मा. श्री. राजेंद्रसिंह यादव यांनी भेट दिली. यावेळी, जोपर्यंत त्या ठिकाणी कायमस्वरूपी जाळी उभी राहत नाही, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेस्क्यू बोट व चार कर्मचारी तैनात करण्यात यावेत, अशी ठोस मागणी करण्यात आली.
या मागणीची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष यादव यांनी सी.ओ. साहेबांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित ठिकाणी त्वरित रेस्क्यू बोट व चार कर्मचारी तैनात करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नगराध्यक्षांच्या या सूचनांची प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करत त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित केली.
या निर्णयामुळे संभाव्य अपघात तसेच जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होणार असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी असलेला धोका लक्षात घेता नगराध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत संवेदनशील व लोकहिताचा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
नगराध्यक्ष यादव यांच्या या तत्पर व दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल कराड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment