कराडमध्ये “Timeless Dharmendra” या भव्य संगीतसंध्येचे आयोजन
कराड : विद्या मोरे
किशोर कुमार फॅन क्लब, कराड यांच्या वतीने बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या सुवर्णकाळाला उजाळा देणारी “Timeless Dharmendra” ही भव्य संगीतसंध्या रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता वेणूताई चव्हाण हॉल, कराड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात धर्मेंद्र यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील अजरामर गीतांचा संगीतप्रवास सादर केला जाणार असून, त्यामध्ये शोले, धरम वीर, प्रतिज्ञा यांसह अनेक लोकप्रिय चित्रपटांतील गाणी ऐकायला मिळणार आहेत. किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या सदाबहार गीतांचे लाईव्ह कराओके व गायन सादरीकरण या वेळी होणार आहे.
सर्व वयोगटातील रसिकांसाठी हा कार्यक्रम खुला असून, डिजिटल एंट्री पासद्वारे प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. कराड शहरातील संगीतप्रेमींना बॉलिवूडच्या सुवर्णयुगात नेणारी ही संगीतसंध्या ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा कार्यक्रम किशोर कुमार फॅन क्लब, यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून या अविस्मरणीय संध्याकाळीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment