रॉयल विमेन्स प्रीमियर लीग महिला क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

 
कराड : विद्या मोरे
कराड येथे रॉयल विमेन्स ग्रुप, कराड यांच्या वतीने आयोजित रॉयल विमेन्स प्रीमियर लीग ही केवळ महिलांसाठीची महिला क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागात यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत कराड, सातारा व कोल्हापूर येथील एकूण १२ महिला संघांनी सहभाग नोंदवून आपले क्रीडा कौशल्य सादर केले.
स्पर्धेचे उद्घाटन सौ. स्मिता हुलवान यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे नियोजन सौ. अनिता शहा, सौ. निकिता मेहता, सौ. रोशनी शहा, सौ. सायल शहा व डॉ. शाल्वी राव यांनी अत्यंत नेटकेपणाने केले.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी चुरशीच्या सामन्यांतून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत सहभागी असलेल्या चॅलेंजेस क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी विशेषतः प्रभावी आणि लक्षवेधी कामगिरी करत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. 

स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीत अनुष्का जगताप हिने विशेष ठसा उमटवला. तिची Best Player म्हणून निवड करण्यात आली. संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण आणि अष्टपैलू कामगिरी करत तिने तब्बल पाच वेळा Man of the Match हा पुरस्कार पटकावला. याशिवाय तिला Best Bowler, Best Batsman तसेच Best Woman of the Series हे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणारी व महिलांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा यशस्वी ठरली. खेळाडू, आयोजक व प्रेक्षक यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली असून, भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धा अधिक प्रमाणात आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार