कराडमध्ये गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा


 
कराड : विद्या मोरे

कराड येथील गोंदवलेकर महाराज उपासना मंडळातर्फे गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव कृष्णाबाई कार्यालयामध्ये मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी कराड शहर व परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली.
मंडळाचे अध्यक्ष प्रा. व्ही. के. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर महाराजांच्या पादुकांची सोमवार पेठ परिसरातून भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान भाविकांनी भजन-नामस्मरण करत महाराजांचा जयघोष केला.
संध्याकाळी गणेश पारगावकर यांच्या भजनी मंडळाचा सुमधुर भजनाचा कार्यक्रम झाला. पालखी स्वागतासाठी सौ. कल्पना जगताप ग्रुप तसेच अश्विनी थोरात व रोहिणी साळवी यांनी आकर्षक रांगोळ्यांनी परिसर सुशोभित केला होता.
गोंदवलेकर महाराजांच्या जीवनकार्य व जन्मावर आधारित कीर्तन ह. भ. प. संदीप मानके यांनी सादर केले. कीर्तनास पेटीसाथ बाळासाहेब चव्हाण यांनी तर तबला साथ विश्वनाथ पुरोहित यांनी दिली. या वेळी सौ. पूजा उमराणी यांनी भावपूर्ण पाळणा गीत गायन करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
महाराजांच्या पादुकांना संजय फाटक पुरोहित ग्रुपतर्फे लघुरुद्र करण्यात आले. त्यानंतर विष्णुसहस्त्रनामाचे पठण वेदांत लाड व पूजा उमराणी ग्रुप यांनी केले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

या प्रसंगी मंडळाच्या समीक्षक डॉ. सौ. शीला कुलकर्णी यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अनंत लाड यांनी सर्व मान्यवर, भाविक व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार