साताऱ्यात नशेचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत? रक्षक प्रतिष्ठानचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 
कराड : विद्या मोरे                                                                            ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एम.डी. गोळ्या व इतर अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा गंभीर आरोप रक्षक प्रतिष्ठानने केला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील अल्पवयीन मुले आणि युवक नशेच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोझर यांनी मा. पोलीस अधीक्षक सातारा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंदी असलेले गांजा व अंमली पदार्थ बाजारात सर्रास उपलब्ध आहेत. गुटख्याचीही खुलेआम विक्री होत असून कायद्याचा धाक उरलेला नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे संबंधित विक्रीचे व्हिडिओ पुरावे असतील, तर पोलिसांकडे माहिती का नाही? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे?” असा थेट प्रश्नही प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे.

देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नशेचे प्रमाण वाढत असल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबतचे निवेदन मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सातारा, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र तसेच जिल्हाधिकारी सातारा यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार