शांततेत व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया यशस्वीआदर्श कामगिरी करणाऱ्या प्रथम दाखल मतदान पथकाचा गौरव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

 

कराड : विद्या मोरे

सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या अनुषंगाने कराड तालुक्यातील सर्व ४८६ मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, निर्भय वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनामुळे तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीच्या भावनेमुळे कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पाहावयास मिळाले.

या निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य करून सर्वप्रथम दाखल झालेल्या सैदापूर मतदान केंद्र क्रमांक १९च्या मतदान पथकाचा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील तसेच गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

सदर मतदान पथकाने सेक्टर अधिकारी एस. डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. वेळेचे काटेकोर पालन करत मतदारांशी सौहार्दपूर्ण वर्तन ठेऊन आदर्श कार्यप्रणाली राबविल्याबद्दल या पथकाचे उपस्थित अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

या गौरवप्राप्त पथकात केंद्राध्यक्ष रामचंद्र तडाखे यांच्यासह रामदास आढे, जयश्री शेंडगे, प्रांजल कुलकर्णी, पोलीस कर्मचारी नयन थोरात तसेच शिपाई आनंदा बुधे यांचा समावेश होता.

यावेळी नायब तहसीलदार महेश उबारे, विश्वजीतसिंह राजपूत, बाबुराव राठोड, मीडिया कक्ष व व्यवस्थापन प्रमुख अक्षय सपाटे, अजिंक्य पाटील, महसूल सहाय्यक प्रकाश नागरगोजे, आनंदराव पोळ, प्रवीण साळुंखे, प्रकाश तुपे, स्वप्निल नलवडे, संगणक ऑपरेटर शिवराज माळी तसेच मीडिया प्रतिनिधी दिलीप माने यांच्यासह निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार