कराडमध्ये १८ फेब्रुवारीला अहिल्यादेवी बँकेचा वर्धापन दिन सोहळा सत्यनारायण महापूजा व ९% विशेष ठेव योजनेची घोषणा

कराड : विद्या मोरे 
अहिल्यादेवी अर्बन-को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूर यांच्या कराड शाखेचा वर्धापन दिन सोहळा बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता समर्थ प्राईड, शाहू चौक ता. कराड, जि. सातारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

सभासद, ग्राहक व हितचिंतकांच्या भक्कम विश्वासाच्या जोरावर बँकेने यशस्वी वाटचाल करत आणखी एक वर्ष पूर्ण केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होणार असून त्यानंतर भक्तिमय वातावरणात सत्यनारायण महापूजा संपन्न होणार आहे. बँकेच्या प्रगतीसाठी तसेच सभासदांच्या आर्थिक समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे.

यावेळी बँकेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा सादर करण्यात येणार असून सभासद व ग्राहकांशी संवाद साधला जाणार आहे. वर्धापन दिनानिमित्त मर्यादित कालावधीसाठी ९१ दिवसांसाठी ९ टक्के व्याजदराची विशेष ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा मिळणार असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

सभासद, ग्राहक, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष अॅड. जनार्दन लक्ष्मण बोत्रे  संचालक मंडळ, सल्लागार व कर्मचारी प्रतिनिधी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९००६९५८००९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार