भरधाव ओम्नीचा मध्यरात्री कहर : रस्त्यावर थरार — 3 ते 4 जणांना उडवले, माजी नगरसेवक जखमी

 कराड : विद्या मोरे

शहरात मध्यरात्री भीषण थरार उडाला, जेव्हा एका भरधाव ओम्नी गाडीने अक्षरशः मृत्यूचा खेळ मांडत कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका मार्गे कन्याशाळा परिसरापर्यंत धडकांची मालिकाच घडवली. 

मिळालेल्या माहितीनुसार, बेफाम वेगात असलेल्या या गाडीने रस्त्यात येणाऱ्या 3 ते 4 जणांना जोरदार धडक देत हवेत फेकले. या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून जखमींमध्ये एका माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. 

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत पोलिसांनी ओम्नी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. 

मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेफाम वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी हो होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार