सुपने विभागात शेतकऱ्यांचा संताप; खंडित वीजपुरवठा रोखण्यासाठी महावितरण कार्यालयात धडक
कराड : विद्या मोरे
खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी संकट बनला!
चार महिन्यांपासून दिवसा आठ तास वीज मिळत असताना, अलीकडच्या दिवसांत वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले.
उन्हाळ्यात शेतातील पाण्याची गरज तीव्र असूनही वीज खंडित झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी कार्यालय मुंढे धडक देऊन लेखी निवेदन दिले.
अखंडित वीजपुरवठा व वाया गेलेली हक्काची वीज नंतर मिळावी, अशी मागणी जोरदार केली.
१० अश्व शक्ती (HP) वीज पंप धारकांसाठी मोफत वीज व थकबाकी माफीची मागणी देखील उपस्थित शेतकऱ्यांनी ठामपणे धरली.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल ग्रामो पाध्ये, अभियंता प्रवीण पाटील, स्वप्नील जाधव यांनी निवेदन स्वीकारून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये शिवाजी पाटील, विश्वास कणसे, सर्जेराव पाटील, हिम्मत पाटील, प्रदीप शिंदे, विनोद पाटील, बजरंग पाटील, भरत कळंबे, निवास गायकवाड, संदीप साळुंखे, विजय सुर्वे, दिलीप पाटील, संजय चव्हाण, पांडुरंग पाटील, संपत सुर्वे, जालिंदर शिंदे, चंद्रकांत शिंदे, विजयसिंह सावंत, दत्तात्रय कोकरे, वसंत शिंदे यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांचा इशारा: मागण्या न मानल्या तर तीव्र आंदोलन करणार आहेत.
Comments
Post a Comment