साताऱ्यात मृत्यूचा कारखाना? जिल्हा रुग्णालयावर गंभीर आरोप; रिपब्लिकन सेनेचा इशारा – २० एप्रिलला आमरण उपोषण

 कराड : विद्या मोरे

  साताऱ्यातील  रुग्णालय आता उपचाराचे केंद्र न राहता “भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचे अड्डे” बनल्याचा घणाघाती आरोप रिपब्लिकन सेनेकडून करण्यात आला आहे. अर्भक मृत्यू, बोगस वैद्यकीय बिले, टक्केवारीचा उघड खेळ आणि रुग्णांची होत असलेली अमानुष पिळवणूक यामुळे संतप्त झालेल्या संघटनेने आता थेट रस्त्यावर उतरून संघर्ष छेडण्याचा इशारा दिला आहे.

रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “२० एप्रिलपर्यंत या रुग्णालयातील गलथान कारभार थांबला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी रुग्णालय प्रशासन आणि पोलीस यंत्रणाच जबाबदार असेल.” यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांची अक्षरशः लूट सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी ‘टक्केवारी’ देणे अनिवार्य झाल्याचे, तर बोगस प्रमाणपत्रे आणि बनावट बिलांचा काळाबाजार खुलेआम सुरू असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. “संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडाली असून, येथे रुग्णांना उपचार नव्हे तर त्रास दिला जातो,” असा संताप व्यक्त करण्यात आला.

अर्भक मृत्यूच्या वाढत्या घटनांवरून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. “ज्या रुग्णालयाला जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, तेथेच निष्पाप बाळांचा मृत्यू होत असेल, तर ही व्यवस्थेची थेट हत्या आहे,” असा तीव्र हल्लाबोल करण्यात आला आहे.

यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हे दाखल केले होते, तरीही कारभारात कोणताही बदल झालेला नाही. उलट, संबंधित अधिकाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना तात्काळ निलंबित करावे, तसेच त्यांच्या कार्यकाळातील सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर शल्यचिकित्सक पदावर कायम असल्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करत, “चौकशी सुरू असताना खुर्चीवर बसूनच पुरावे गायब करण्याचा प्रकार चालू आहे का?” असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

हे आंदोलन , आणि यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, अशोक भिसे, विशाल भोसले, नितीन रोकडे, गौतम रणदिवे, पद्माताई सुतार, रमेश गायकवाड, विशाल वायदंडे, प्रकाश कांबळे, संदीप सावंत, सरफराज बागवान, दीपक ओव्हळ, राजू कदम आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, बालकल्याण मंत्री, सातारा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. आता प्रशासन या “इशाऱ्याला” गांभीर्याने घेते की पुन्हा एकदा दुर्लक्ष करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याचबरोबर, जिल्ह्यातील इतरही अनेक ठिकाणी गैरव्यवहाराचे पडसाद उमटत असून, अशा प्रकारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ   कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ ठरेल, असा संतप्त इशाराही देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार