कराड नगरपरिषदेच्या अवास्तव भाडेपट्टा कराबाबत महत्त्वपूर्ण बैठक; शासनस्तरावर लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा

 कराड : विद्या मोरे                                                                    कराड नगरपरिषदेच्या अवास्तव भाडेपट्टा करात कपात करण्यात यावी, या मागणीसाठी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करत माननीय नगराध्यक्ष श्री राजेंद्र सिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित प्रश्नांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा होऊन लवकरच शासनस्तरावरून मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस उपनगराध्यक्ष श्री प्रतापराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष श्री जयंत काका पाटील, मा. मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर, अर्जदार श्री सौरभ पाटील तसेच क्रेडाई कराडचे प्रतिनिधी श्री तनय जाधव, श्री अमित सूर्यवंशी, श्री धनंजय कदम, श्री दीपक रैनाक आणि श्री यादव उपस्थित होते.
भाडेपट्टा करातील वाढ, वाढीव क्षेत्रातील सिटी सर्व्हेचे प्रश्न, तसेच नागरिकांवर पडणारा आर्थिक भार या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यापारी व नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन कर रचनेत सुसूत्रता आणण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणांनुसार योग्य तो मार्ग शोधण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार