धडाकेबाज कारवाईनंतर डीबी प्रमुख निखिल मगदुम यांचा सत्कार; ‘वीस घर फोडी’ प्रकरणातील आरोपीला अटक करत कायदा सुव्यवस्थेला दिला मजबूत धक्का
कराड : विद्या मोरे
नव्याने डीबी (डिटेक्शन ब्रांच) चा कार्यभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच प्रभावी कामगिरी करत “वीस घर फोडी” परिसरातील आरोपीला अटक करणाऱ्या माननीय निखिल मगदुम साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
भीम आर्मी संविधान रक्षक दल या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे कराड शहराध्यक्ष जुनेद मोमीन यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. मगदुम साहेबांच्या तत्पर आणि धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी कराड शहर अध्यक्ष युनिटचे मोमीन सादिक सय्यद, दादाभाई आंबेकरी, राहुल पाटील, महेश गवळी, अनिल गायकवाड तसेच इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्वांनी मगदुम साहेबांच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय जुनेद मोमीन (कराड शहर अध्यक्ष) यांनी केले.
Comments
Post a Comment