उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साताऱ्यात मोफत हृदय तपासणी शिबिर

 
कराड: विद्या मोरे ; राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सातारा येथे समाजोपयोगी उपक्रम म्हणून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, Dr. Shrikant Shinde Foundation, Jupiter Hospital ठाणे, आरोग्यदूत फाउंडेशन, शिवसेना सातारा जिल्हा तसेच जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० या वेळेत जिल्हा रुग्णालय, सातारा येथे हे शिबिर पार पडणार आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत २० इको (हृदय तपासणी) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्यक रुग्णांसाठी पुढील हृदय शस्त्रक्रियेची सोयही करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून, डॉ. आशितोष सिंह व डॉ. पूजा सिन्हा हे रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सातारा यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. संतोषकुमार बामणे (९३७१९१११३१), श्री. संदीप जाधव (९९६०००२२३३) व श्री. दीपक चव्हाण (९०९६०७६६४४) यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार