हायवेवर डाव फसला! कराड पोलिसांची सापळा कारवाई; ३ आरोपी अटकेत, ९ लाखांचा माल जप्त
*कराड विद्या मोरे:*
कराड तालुक्यातील हायवेवरील चोरी प्रकरणाचा छडा लावत गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत ३ आरोपींना अटक केली असून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कराड तालुका पोलीस ठाण्यात गु.र. नं. 225/2026, BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, दि. १० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे नारायणवाडी (ता. कराड) हद्दीत कोल्हापूर–सातारा हायवेवरील ‘प्रणव वाईन शॉप’ समोर उभ्या असलेल्या पोकलेन मशीनचा ब्रेकर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
या प्रकरणाच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत करण्यात आले होते.
या दरम्यान, तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालखेड फाटा येथे सापळा रचला. यावेळी टाटा ACE (एमएच-23 एयू 6597) हे संशयित वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये चोरीस गेलेला पोकलेन ब्रेकर आढळून आला.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
*अटक आरोपी:*
जगन्नाथ किसन काळे (वय 47, रा. बीड)
जितेंद्र लक्ष्मण मुळूक (वय 25, रा. अंबड, जि. जालना)
महादेव फलाजी भिसे (वय 35, रा. परतूर, जि. जालना)
*जप्त मुद्देमाल:*
पोकलेन ब्रेकर (F23 PLUS) – 5 लाख रुपये
टाटा ACE टेम्पो – 4 लाख रुपये
एकूण किंमत – 9 लाख रुपये
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पोलीस उपनिरीक्षक सखाराम बिराजदार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी ती यशस्वीरीत्या अंमलात आणली.
Comments
Post a Comment