डॉ. महेश खुसपे यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित शैक्षणिक शिष्टमंडळात निवड; जागतिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी

 

कराड : विद्या मोरे :भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी घटना घडली असून, डॉ. महेश खुसपे (चेअरमन, कोटा अकॅडमी) यांची अमेरिकेतील शैक्षणिक शिष्टमंडळात निवड झाली आहे. तर्फे भारतातील निवडक शिक्षण तज्ञांना अमेरिकेतील विविध शिक्षण संस्थांना भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

दिनांक 27 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या अभ्यास दौऱ्यात राज्यातील व येथील नामांकित शैक्षणिक संस्थांना भेटी देण्यात येणार आहेत. या दौऱ्यात कंपनीच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या या आधुनिक शाळेला भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतींचा अभ्यास केला जाणार आहे.

यानंतर जगप्रसिद्ध कार्यालयाला भेट देऊन सोबत विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शिक्षणातील वापर, डिजिटल शिक्षणाच्या नव्या दिशा आणि भविष्यातील संधी यावर सखोल विचारमंथन होणार आहे.

तसेच जागतिक कीर्तीच्या येथे भेट देऊन संशोधनाधारित शिक्षण पद्धती, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम आणि आधुनिक शैक्षणिक संकल्पनांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या अत्याधुनिक “स्पेसशिप” कॅम्पसला भेट देऊन शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर, नवकल्पना आणि भारतात त्याची अंमलबजावणी यावर तज्ञांसोबत वैचारिक देवाण-घेवाण होणार आहे.

या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यामुळे भारतीय शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींचा अवलंब आणि जागतिक दर्जाचे ज्ञान मिळण्यास निश्चितच चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ. महेश खुसपे यांच्या निवडीमुळे स्थानिक तसेच राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार