शेतकरी संघटनेचे नेते अनिल घराळ बापू उद्या शिवसेनेत; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात राजकीय भूकंपाची चिन्हे

कराड विद्या मोरे

 शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते अनिल घराळ बापू हे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

अनिल घराळ बापू हे शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे, आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून सातारा जिल्ह्यात ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने विविध आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत.

आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रवेशासाठी सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू तसेच कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते.

दरम्यान, या राजकीय घडामोडीमुळे सातारा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार