कराड: दिवटे गल्लीतील पाण्याच्या टाकी कामावर निष्काळजीपण – रिक्षाला धडक, मोठे नुकसान

कराड विद्या मोरे – कराड नगरपरिषद हद्दीतील रविवार पेठेतील दिवटे गल्ली येथे नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीच्या कामात निष्काळजीपणामुळे अपघात घडला. विना चालक आलेल्या डंपरने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, काम सुरू असताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. ठेकेदाराकडून ना सुरक्षा रक्षक, ना इशारा फलक अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. या निष्काळजीपणामुळेच डंपर नियंत्रणाबाहेर जाऊन रिक्षावर आदळला.

सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी नव्या रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा धोकादायक कामांदरम्यान योग्य सुरक्षा उपाययोजना बंधनकारक करावी, अशीही मागणी केली आहे.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार