वांगीकर अकॅडमीत जेईई मेन्स, बारावीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार जिद्द, चिकाटी आणि परिश्रम हाच यशाचा मंत्र : पत्रकार देवदास मुळे
कराड येथील वांगीकर अकॅडमीमध्ये जेईई मेन्स व बारावी सायन्स परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या “स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार” सन्मानित पत्रकार देवदास मुळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेईई मेन्स व बारावी सायन्समध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या अथर्व काशीद, अर्जुन पाटील, सानिया भालदार, वैजयंती सोनावणे यांचा गौरव करण्यात आला. तसेच मॅथ्स व फिजिक्स विषयात उत्तुंग यश मिळविणाऱ्या आदर्श जगताप, अनन्या पाटील, इरा कुलकर्णी, संजना घळसासी, भार्गव वझे, माधवन जोशी आणि अस्मी चिवटे यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पत्रकार देवदास मुळे म्हणाले, “जिद्द, चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावरच विद्यार्थ्यांना यश मिळते. स्पर्धेच्या युगात अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून स्मार्टनेससह सातत्यपूर्ण मेहनत घेणे आवश्यक आहे. मोबाईलचा अतिरेक टाळणेही तितकेच गरजेचे असून पालकांनी याबाबत सजग राहिले पाहिजे. मेहनतीला कोणताही पर्याय नाही.”
प्रास्ताविकात अकॅडमीचे संस्थापक डायरेक्टर ओम वांगीकर यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत बनवणे नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास घडवून देशाचा जबाबदार नागरिक तयार करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे.”
पालक प्रतिनिधी सौ. कल्पना पाटील यांनी “ओम सर आणि वांगीकर अकॅडमीतील सर्व शिक्षकांच्या कठोर परिश्रमामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाले,” असे गौरवोद्गार काढले. तर विद्यार्थिनी वैजयंती सोनावणे हिने, “ओम सर आणि वांगीकर मॅडम यांनी सातत्याने अभ्यास करून घेत मनोधैर्य वाढवले, त्यामुळेच आम्हाला हे यश मिळाले,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात परिचय चैतन्य वांगीकर यांनी करून दिला, तर सत्कार ओम वांगीकर यांनी केला. संस्थेच्या चेअरमन सौ. अमृता वांगीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले.
दरम्यान, वांगीकर अकॅडमीमध्ये सेमी इंग्लिश व इंग्लिश मिडियमच्या इयत्ता आठवी, नववी, दहावीच्या सर्व विषयांच्या तसेच अकरावी-बारावीच्या रेग्युलर व रिपीटर बॅचेस सुरू असून विद्यार्थ्यांना जेईई मेन्स, नीट व सीईटी परीक्षांची दर्जेदार तयारी करून घेतली जाते.
Comments
Post a Comment