मदर्स डे निमित्त कराडमध्ये रंगला क्रिकेट, होम मिनिस्टर आणि नृत्याचा जल्लोष कै. विमल सातपुते फाऊंडेशन व एस. डी. एस. डान्स स्टुडिओचा उपक्रम उत्साहात संपन्न

 
कराड :  विद्या मोरे  कै. विमल सातपुते फाऊंडेशन व एस. डी. एस. डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मदर्स डे निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धा, होम मिनिस्टर कार्यक्रम आणि सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, बुधवार पेठ, कराड येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गेल्या १२ वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना डान्स कलेचे प्रशिक्षण देणाऱ्या एस. डी. एस. डान्स स्टुडिओतर्फे आयोजित या उपक्रमात विविध स्पर्धांसह मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

क्रिकेट स्पर्धेत “ट्रॅक्टर टीम परमानंट” संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. “छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केट” संघाने द्वितीय क्रमांक, “वाढीव भाग वाकाण” संघाने तृतीय क्रमांक तर “वॉर्ड बुधवार पेठ” संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “होम मिनिस्टर” कार्यक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रियंका कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, रिजवाना मुलाणी यांनी द्वितीय क्रमांक तर संजना काठरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

यावेळी कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा “आरोग्य योद्धा” पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. समाजासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते एस. डी. एस. डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले आकर्षक नृत्याविष्कार. विविध गाण्यांवर सादर झालेल्या दमदार नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी अंबाली मॅडम, कोरिओग्राफर उदय सातपुते सर, प्रतिक वाघमारे सर आणि अंकिता वाघमारे मॅडम यांनी केले. तसेच जयश्री गुरव मॅडम, दिलीप गुरव सर, कै. समीर पवार मित्र परिवार, ड्रीम सेवन, संकेत ज्वेलर्स, ए.पी. ग्रुप, एस.के. चिकन, गणेश कॅज्युअल, जी.के. डिस्ट्रीब्युटर, राज मेडिकल, एस. के. कुलकर्णी सर आणि मनपसंद बिर्याणी हाऊस यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला रील स्टार नेहा थोरात, गिरिजा कराडकर, अँकर अस्मी आणि समीर संदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अभिजित खवळे, सागर सातपुते, रवी काठरे, महेंद्र काठरे आणि प्रमोद कांबळे यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत मदर्स डे निमित्त महिलांचा सन्मान, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कलांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार