## कराड शहर पोलिसांची अवैध व्यवसायांवर धडक मोहीम अवैध धंद्यांवर पोलिसांचा करारी प्रहार; जनहिताय फाऊंडेशन कडून अभिनंदन

कराड : विद्या मोरे

कराड शहरात सुरू असलेल्या विविध अवैध व्यवसायांविरोधात कराड शहर पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, शहरात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या धाडसी, तत्पर आणि कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरभरातून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात सुरू असलेल्या गांजाची विक्री, ऑनलाईन लॉटरी, छुप्या पद्धतीने चालणारे क्लब तसेच विविध जुगार अड्डे यांच्यावर पोलिसांनी सातत्याने धडक कारवाया करून गुन्हेगारी प्रवृत्तीला कठोर इशारा दिला आहे.

या कारवायांमुळे अनेक ठिकाणी अवैध धंदे बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांनी दाखविलेल्या धाडसामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाली आहे.

कराड शहर पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईचे जनहिताय फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष स्वागत करत पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

“समाजात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि तरुण पिढीला व्यसन व चुकीच्या मार्गापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांची ही मोहीम अत्यंत कौतुकास्पद आहे.”

बापुसाहेब लांडगे

पुढील काळातही पोलिस प्रशासनाने अशाच कठोर व प्रभावी कारवाया सुरू ठेवून कराड शहर गुन्हेमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सोमनाथ पवारराजेंद्र ताटे यांनीही कराड शहर पोलिसांच्या धाडसी व जनहिताच्या कार्याचे कौतुक केले.

कराड शहर पोलिसांच्या प्रभावी कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असून, शहरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रभावीपणे कार्यरत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार