नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; कराडमध्ये युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा”; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

 

कराड : विद्या मोरे ; देशभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेत सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने कराड येथील दत्त चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवस्था आणि वाढत्या अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या अशा प्रकारांना तात्काळ आळा घालावा तसेच परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस तथा सातारा जिल्हा प्रभारी भुषण राणभरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली जाधव, प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार, प्रदेश सरचिटणीस विश्वजीत जाधव, अजा-अज विभाग जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, तालुका अध्यक्ष देवदास माने, दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, उत्तर अध्यक्ष प्रवीण वेताळ, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, पाटण अध्यक्ष नरेंद्र पाटणकर, तालुका ओबीसी विभाग अध्यक्ष डी. एस. काशीद, दिग्विजय सूर्यवंशी, शाहरुख मुल्ला, सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय जमाले, राम मोहीते, अक्षय सुर्वे, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, उमर सय्यद, मयुर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उदय जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे म्हणाले, “देशातील लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून स्पर्धा परीक्षा देत असताना वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फेरले जात आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार युवक काँग्रेस सहन करणार नाही.”

सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार यांनी सांगितले की, “नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटना समोर येणे ही अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरू राहील.”

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवावा, परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करावी तसेच पेपरफुटी प्रकरणातील मुख्य दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार