सत्यजित केसरी पर्व ४” चा वारुंजीत थरार नामदेव पाटील आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत; ६ लाख ४० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले लाईव्ह प्रक्षेपण
कराड : विद्या मोरे : मा. श्री. नामदेव काशिनाथ पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. १७ मे २०२६ रोजी वारुंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या “सत्यजित केसरी पर्व ४” या भव्य बैलगाडा शर्यतीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. हजारो बैलगाडा शौकीनांच्या उपस्थितीत रंगलेल्या या शर्यतीत थरार, वेग आणि जल्लोष यांचा संगम पाहायला मिळाला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सौ. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा “पश्चिम महाराष्ट्र केसरी राजा” आणि जगदाळे यांचा “संग्राम” ही जोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. किरण आप्पा कालगाव यांचा “रैना” व भीमगावकरांचा “सावकार” या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला. पै. आनंदराव आप्पा रेठरेकर यांचा “राजा” व म्हारुगडे वाडीकरांचा “मन्याभाई” या जोडीने तृतीय क्रमांक मिळवत उपस्थितांची दाद मिळवली.
तसेच सुजगावकरांचा “बकासुर” व दुगा कालढाणकरांचा “चिक्या”, तसेच दाहिगावकरांचा “पाखऱ्या” या जोड्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. गिरवीकरांचा “माऊला” व लाबादकरांचा “कृष्णा” हा जोडा पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला. कोरेगावकरांचा “भवानी” व पवार यांचा “अवतार” या जोडीने सहावा क्रमांक मिळवला, तर पंढरीनाथ फडके यांचा “रोमन” व साखरवाडीकरांचा “बावऱ्या” ही जोडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली.
या बैलगाडा शर्यतीचे समालोचन सुनील मोरे यांनी प्रभावी शैलीत केले, तर झेंडापंच म्हणून सोमनाथ जगदाळे यांनी जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पी. ३ पवन यादव यांनी केले. विशेष म्हणजे या शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण तब्बल ६ लाख ४० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले असून, सोशल मीडियावरही या स्पर्धेची मोठी चर्चा रंगली.
कार्यक्रमास मा. श्री. नामदेव पाटील आप्पा, अध्यक्ष कराड दक्षिण काँग्रेस कमिटी, मा. श्री. बाळासाहेब पाटील आबा, मा. श्री. अजित पाटील आप्पा चिखलीकर, मा. श्री. गजानन आवळकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, मा. श्री. सुनील पाटील, प्रा. धनंजय काटकर, प्रदीप जाधव, रवींद्र बडेकर, संभाजी चव्हाण, महादेव पाटील, नथुराम झिमरे (बापू), संदीप काकडे, सुरेश भोसले (आप्पा), हणमंत भापत, विजय मान, शिवाजीराव जमाल, भीमराव जमाल, मुजाम इनामदार, सुभाष चव्हाण, विश्वास निकम, राहुल पवार, अभिजीत पवार, राहुल काळोखे यांच्यासह बैलगाडा शौकीन, नामदेव पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते, बैलगाडा कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सत्यजित केसरी पर्व ४” मुळे वारुंजी परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, ही शर्यत बैलगाडा प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली.
Comments
Post a Comment