दहावीच्या निकालात चाटे शिक्षण समूहाच्या गुणवंतांचा वर्षाव कराड-मलकापूर शाखेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कराड : विद्या मोरे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या कराड व मलकापूर शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली. निकाल जाहीर होताच चाटे क्लासेस व चाटे आयआयटी-नीट अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमास कराड शाखा व्यवस्थापक प्रा. रमेश बनकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शर्वरी गोरे ठरली प्रथम
कराड-मलकापूर शाखेतून शर्वरी गोरे हिने ९८.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मृणाल पाटील ९८.२० टक्के, स्वरा पाटील ९७.२० टक्के, सारा नदाफ ९७.०० टक्के, आकांक्षा नाईकवाडी ९६.२० टक्के, प्रतीक सपकाळ ९५.६० टक्के, ऋतुजा यादव ९५.०० टक्के, राजेश्वरी जगताप ९४.६० टक्के, यश पवार ९४.६० टक्के, श्वेता चौरे ९४.४० टक्के, मनीष पाटील ९४.०० टक्के, तनिष्का पाटील ९४.०० टक्के, देवयानी जेऊरकर ९३.८० टक्के, सुदर्शन पाटील ९३.८० टक्के, संस्कार कचरे ९३.२० टक्के, वेदिका मोरे ९३.०० टक्के, श्रावणी नागरे ९३.०० टक्के, पूर्वा पिसाळ ९३.०० टक्के, विश्वजीत मुळे ९२.८० टक्के, संस्कृती गावडे ९२.६० टक्के आणि वेदिका चव्हाण हिने ९२.२० टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
९० टक्क्यांहून अधिक गुणांची चमकदार कामगिरी
तसेच समीक्षा मोरे, प्रार्थना पिसे आणि आदित्य उपाध्ये यांनी प्रत्येकी ९१.८० टक्के गुण मिळवले. देविका बाबर ९१.६० टक्के, विभावरी चव्हाण ९१.४० टक्के, त्रिशा शिंदे ९०.८० टक्के, मिसबा मुजावर ९०.४० टक्के, स्वराली जाधव ९०.२० टक्के, सर्वेश शिंदे ९०.२० टक्के, स्वरांजली जाधव आणि महेक तांबोळी यांनी प्रत्येकी ९० टक्के गुण मिळवत विशेष यश मिळवले.
इतर विद्यार्थ्यांचाही सन्मान
याशिवाय समृद्धी चव्हाण ८९.८० टक्के, समृद्धी पवार ८९.६० टक्के, पौर्णिमा हुलवान ८९ टक्के, अजिंक्य पाटील ८९ टक्के, नोमन मुल्ला ८८.८० टक्के, प्रांजली जिरंगे ८८.६० टक्के, रणवीर सूर्यवंशी ८८.६० टक्के, प्रांजली कदम ८८.४० टक्के, आयुष काटे ८८.४० टक्के, अथर्व तांबे ८८ टक्के, ऋषिकेश देसाई ८७.८० टक्के, अनुश्री जाधव ८७.८० टक्के, मोहम्मद झहीर वाईकर ८७.४० टक्के, समर्थ शेवाळे ८७.२० टक्के, महेक मुल्ला ८७ टक्के, स्वप्नाली जाधव ८६.८० टक्के, अद्वैत सावंत ८६.८० टक्के, नरेंद्र खराडे ८६.४० टक्के आणि चैतन्य जाधव ८६ टक्के गुण मिळवत यश मिळवले.
शिक्षकांचाही गौरव
यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच वर्षभर मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
पालकांनी व्यक्त केल्या भावना
“चाटे पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली. नियमित सराव परीक्षा आणि वैयक्तिक मार्गदर्शनामुळे उत्कृष्ट निकाल लागला,” अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.
दहावी हा शेवट नाही : प्रा. रमेश बनकर
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. रमेश बनकर म्हणाले, “दहावीचा निकाल हा शेवट नसून पुढील शिक्षणाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी अकरावी-बारावी सोबतच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीएसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी वेळेत सुरू करणे आवश्यक आहे.”
करिअर निवडताना आवड महत्त्वाची
“मित्र किंवा नातेवाईकांच्या सांगण्यावरून नव्हे, तर स्वतःच्या आवडीनुसार करिअरची दिशा ठरवा. स्वतःतील गुण ओळखा, सकारात्मक विचार ठेवा आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
उत्साहात पार पडला सत्कार समारंभ
कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
Comments
Post a Comment