खरेदी, स्वाद आणि मनोरंजनाचा संगम; रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने “रोटरी शॉपिंग फेस्टिव्हल २०२६” चे भव्य आयोजन
रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने “कराड रोटरी शॉपिंग फेस्टिव्हल २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले असून, दि. १६ ते १९ मे २०२६ या कालावधीत स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, पी. डी. पाटील उद्यान शेजारी, शनिवार पेठ, कराड येथे हा फेस्टिव्हल रंगणार आहे. कराडमध्ये तिसऱ्यांदाच आयोजित करण्यात येणाऱ्या या फेस्टिव्हलकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, महाबळेश्वर, पाचगणी, आग्रा तसेच karad पंचक्रोशीतील विविध व्यावसायिकांचे आकर्षक व नाविन्यपूर्ण स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. महिलांसाठी हा फेस्टिव्हल खास खरेदीची पर्वणी ठरणार असून सुंदर साड्या, ड्रेस मटेरियल, पर्स, चप्पल, मोत्यांचे दागिने, कृत्रिम दागिने, परफ्युम तसेच घरासाठी अत्याधुनिक वस्तू उपलब्ध असणार आहेत.
याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, गॅस शेगड्या, आधुनिक चिमण्या, सौर उत्पादने, किचनवेअर, इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी, दुचाकी, बँकिंग व विमा क्षेत्रातील विविध स्टॉल्सही प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. खवय्यांसाठी पावभाजी, भेळ, चाट, आईस्क्रीम, थालीपीठ, रोल्स, स्नॅक्स, मिठाई तसेच आग्र्याचे सुप्रसिद्ध पेठे अशी खास मेजवानी असणार आहे.
फेस्टिव्हलमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सुंदर पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजन, खरेदी आणि विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण असा हा फेस्टिव्हल ठरणार असून प्रदर्शनामध्ये ७५ ते ८० हून अधिक स्टॉल्स सहभागी झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष , गटनेते , चे संदीप कराळे, चे चेअरमन , उपाध्यक्ष , असिस्टंट गव्हर्नर , , आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सहकुटुंब भेट देत खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष , सचिव तसेच फेस्टिव्हल प्रमुख , सहप्रमुख आणि सर्व रोटरी सदस्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment