प्रतिबंधात्मक कारवाईचा भंग करून पुन्हा गुन्हे केल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार पद्या सोळवंडेवर पोलिसांची कठोर कारवाई करत थेट जेलमध्ये रवानगी

 कराड : विद्या मोरे

कराड शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत प्रदयुम्न ऊर्फ पद्या दिपक सोळवंडे (रा. बुधवार पेठ, कराड, जि. सातारा) यास तुरुंगात रवानगी केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन करून पुन्हा शरीराविरुद्धचे गुन्हे केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

कराड शहर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, प्रदयुम्न ऊर्फ पद्या सोळवंडे हा वारंवार मारामारी व शरीराविरुद्धचे गुन्हे करत असल्याने त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्याकडून चांगली वर्तणूक ठेवण्याच्या अटीवर एक वर्ष मुदतीचे २० हजार रुपयांचे अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते.

मात्र, बंधपत्राचा कालावधी सुरू असतानाच आरोपीने पुन्हा कायद्याचे उल्लंघन केले. दि. १४ एप्रिल २०२६ तसेच दि. १३ मे २०२६ रोजी त्याच्याकडून पुन्हा शरीराविरुद्धचे गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याने चांगल्या वर्तणुकीच्या अटींचा स्पष्ट भंग केल्याचे समोर आले.

या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलिस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर यांनी आरोपीविरुद्ध वॉरंट जारी केले. त्यानुसार प्रदयुम्न ऊर्फ पद्या दिपक सोळवंडे यास दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत तुरुंगात ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

कराड शहर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया पुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार